लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरवलेल्या काँग्रेसच्या 6 आमदारांना भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवले होते. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भाजपने काल उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये धर्मशाळामधून सुधीर शर्मा, सुजानपूरमधून राजिंदर राणा, लाहौल स्पीतीमधून रवी ठाकूर, बडसरमधून इंदर दत्त लखनपाल, गगरेटमधून चैतन्य शर्मा, कुतलाहारमधून देवेंद्र भुट्टो यांना उमेदवारी दिली आहे. या सहा मतदारसंघात 1 जून रोजी मतदान होणार आहे.