लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काल शुक्रवारी 8 मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शुक्रवारी संध्याकाळी पक्षाने 39 उमेदवारांची घोषणा केली. या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांच्या नावाचा समावेश आहे.
यादीनुसार राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील, 24 उमेदवार एससी-एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील आहेत. गेल्या 2 मार्च रोजी भाजपने 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपच्या यादीनंतर 5 दिवसांनी काँग्रेसची पहिली यादी आली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत छत्तीसगडधील 6 पैकी 1 माजी मुख्यमंत्री, 2 माजी मंत्री यांची नावे आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि दोन माजी मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. आता एक-दोन दिवसांत काँग्रेसची 5 नावे जाहीर होऊ शकतात. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत केरळमधील 20 पैकी 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राहुल गांधी यांना वायनाडमधून चौथ्यांदा आणि तिरुवनंतपुरममधून तीनवेळा खासदार राहिलेले शशी थरूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय सरचिटणीस केसी वेणुगोपाल अलप्पुझा येथून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने यावेळीही 16 पैकी 14 नावांची पुनरावृत्ती केली आहे.