बेनुर्डे, केपे येेथे जंगली भागात शेतीचे काम करायला गेलेल्या राजेंद्र गावकर (49) याला अचानक गोळी लागून गंभीर जखमी झाला. शनिवार दि. 24 रोजी हा प्रकार घडला. कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. 24 रोजी राजेंद्र गावकर बेनुर्डे, केपे येथील असून ते नावरा येथे सकाळी 6.30 वा. स्वत:ची बंदूक घेऊन शेतात गेले होते. परवाना नसलेली बंदूक त्यांच्याकडे होती. निष्काळजीपणे वापर करताना चुकून गोळी सुटली व त्यांच्या गुडघ्याला लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. या गोळीबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्त्या की चुकून गोळी लागली याविषयी पोलीस तपास करीत आहे.