शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या

0
21

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला दिलेले नाव पुढील आदेशांपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शरद पवार गटाच्या याचिकेवरील सुनावणीवेळी दिले. त्यामुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशांपर्यंत कायम राहणार आहे. याशिवाय न्यायालयाने निवडणूक आयोगाला पुढील 7 दिवसांत या गटाला निवडणूक चिन्ह देण्याचेही निर्देश दिले आहेत.