टाळेबंदीचा हणजूण, वागातोरमध्ये निषेध

0
7

हणजूण व वागातोर किनाऱ्यावरील तब्बल 175 आस्थापने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार सील करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काल हणजूण व वागातोर परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला.गोवा सरकारला किनारी विभाग व्यवस्थापन नकाशा तयार करण्यास अपयश आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काल हणजूण व वागातोर परिसरातील किनाऱ्यांवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी केला. सील करण्यात आलेल्या दुकानांपैकी बरीच दुकाने ही सीआरझेड कायदा अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपासून हणजूण व वागातोर येथे होती, असा दावा ह्या व्यावसायिकांनी केला आहे. सरकारने सील ठोकलेल्यांमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स व किरकोळ सामान दुकाने आदींचा समावेश आहे. सरकारने सीआरझेड प्रश्नात लक्ष घालून सील केलेली दुकाने उघडण्यास मदत करावी, अशी मागणी ह्या दुकानदारांनी केली आहे.