26 फेब्रुवारीपर्यंत सूचना सेठ हिच्या कोठडीत वाढ

0
14

येथील बाल न्यायालयाने स्वतःच्या 4 वर्षांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या सूचना सेठ हिच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सोमवार दि. 26 फेब्रुवारीपर्यंत वाढ काल केली. संशयित सूचना सेठ हिच्या न्यायालयीन कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने काल तिला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला बाल न्यायालयात संशयित सूचना सेठ हिच्या वडिलांनी तिच्या मानसिक स्थितीची तपासणीसाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कळंगुट पोलिसांनी संशयित सूचना सेठ हिची नव्याने मानसिक तपासणी करण्यास हरकत घेतली आहे. तिची गेल्या 2 फेब्रुवारीला बांबोळी येथील सरकारी इस्पितळात मानसिक तपासणी करण्यात आली होती. त्या तपासणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तिची पुन्हा मानसिक तपासणीची गरज नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.