कॅसिनो धोरणाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल : कॉंग्रेस

0
90

कॅसिनो धोरण तयार करून ते विधानसभेत मांडून संमत करण्याचा पर्रीकर सरकारचा निर्णय जनतेची दिशाभूल करणारा आहे. आज विधानसभेत सादर होणारे हे धोरण म्हणजे कायदा नव्हे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष शांताराम नाईक यांनी सांगितले. सरकारने सार्वजनिक जुगार कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. गोव्याला गोवा सार्वजनिक जुगार कायद्यातील (१३ अ) साठी दुरुस्तीची गरज आहे. मांडवी नदीच्या पात्रातून कॅसिनो जहाजे हटविण्यात यावीत ही जनतेची जुनी मागणी आहे. कॅसिनो धोरण तयार केल्याने ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही, असे नाईक यांचे म्हणणे आहे. कॅसिनोमुळे राज्याच्या महसूलात वाढ झाल्याचे विधानसभेत सांगणारे पर्रीकर कॅसिनोसाठी कायदा केला नाही म्हणून कॉंग्रेसला का बरे दोष देतात, असा प्रश्‍नही नाईक यांनी केला आहे. कायद्यातील ऑफशोर कॅसिनोची व्याख्या बदलण्यास सरकार तयार नसल्याचे नाईक यांनी सांगितले. कॅसिनो धोरणाच्या नावाखाली पर्रीकर यांनी जनतेची दिशाभूल करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नवर्‍या