उत्तर प्रदेश एटीएसने रशियातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या सत्येंद्र सिवाल या कर्मचाऱ्याला मेरठ येथून अटक केली आहे. सत्येद्र हा कर्मचारी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसएससाठी काम करत होता. सत्येंद्र मॉस्को येथील भारतीय दूतावासात तैनात आहे. तो मूळचा हापूरचा आहे. 2021 पासून सत्येंद्रची भारतातील सर्वोत्तम सुरक्षा साहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तो पाक हस्तकांच्या संपर्कात होता. एटीएस मेरठ युनिटने केलेल्या चौकशीदरम्यान सत्येंद्रने हेरगिरीची कबुली दिली असून यूपी एसटीएसचे वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.