माणिकराव ठाकरे अखेर गोव्यात दाखल

0
13

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नवीन गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आपल्या नियुक्तीनंतर पहिल्यांदाच गोवा प्रदेश काँग्रेस कार्यालयाला काल भेट दिली. गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. आपल्या दुसऱ्या भेटीत पक्ष संघटनेबाबत सविस्तर चर्चा करणार आहे, अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. येत्या 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेच्या स्टिकरचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लुस फेरेरा, दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन व इतरांची उपस्थिती होती.