जेएन.1 चे देशभरात आतापर्यंत 23 रुग्ण

0
8

कोरोनाच्या जेएन.1 या नव्या विषाणूचे रुग्ण जगभरात वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत 40 देशात या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. भारतामध्ये जेएन.1 या विषाणूचे आतापर्यंत 23 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण गोव्यात आढळले असून गोवामध्ये जेएन.1 विषाणूचे 19 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. तर केरळ आणि महाराष्ट्रात जेएन.1 या कोरोना विषाणूचे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळला आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत असून सध्या देशात कोरोनबाधित रुग्णसंख्या 2669 आहे. काल गुरूवारी देशात 358 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 24 तासात फक्त केरळमध्ये 300 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.