15 डिसेंबरपर्यंत तिळारी धरणाच्या दुरुस्तीचे काम

0
33

10 ऑक्टोबर ते 15 डिसेंबरपर्यंत तिळारी धरणाच्या कालव्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील पेडणे, बार्देश, डिचोली आदी तालुक्यांना या काळात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. या काळात उत्तर गोव्यातील तालुक्यांना अस्नोडा, अंजुणे व आमठाणे धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जलसंसाधनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. तिळारी धरणाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या सहाव्या बैठकीत तिळारी धरणाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 330 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता.