Home बातम्या हळदोण्यात दुकानांना आग लागून १५ लाखांची हानी

हळदोण्यात दुकानांना आग लागून १५ लाखांची हानी

0

या दोन्ही दुकांनापैकी गॅगरी कार्व्हालो यांच्या गॅगरी आयडीया पॉईट नामक दुकानातील एक वातानुकुलीत मशीन, काही प्रमाणातील फर्निचर, पंखे, मोबाईल, कॅमेरा व इतर वस्तू जळून १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या दुकानाचे मालक गॅगरी कार्व्हालो यांनी दिली. तर एडवीन परेरा यांच्या किराणा दुकानालाही आग लागून आतील कडधान्य व इतर तांदूळ, फ्रीज व इतर सामान जळून ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानाचे मालक एडवीन परेरा यांनी दिली.

ही आग पहाटे ३ वाजता लागली होती. त्यांची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला व्हिक्टर डिसोझा यांनी दिली. त्यावर अग्निशामक दलाचे जवान अंकुश मळीक, रत्नाकर गावस, रमेश हरमलकर, शैलेश पाटणेकर, आनंद नाईक, नरेंद्र शेट्ये, दीपक वळवईकर, विष्णू गावस, सतीश डेगवेकर यांनी दोन पाण्याचे बंब वापरून आग विझविली. अग्निशामक दलाचे जवान राजेंद्र हळदणकर व दत्ताराम रेडकर यांनीही घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यासंबंधी म्हापसा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.