ज्या माणसाला इतिहाची जाणीव नाही तो त्याला भविष्यात जीवनात यश मिळत नसते. स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव व्हावी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अत्याचार सहन केले हे चित्र रूप इतिहास ठेवण्यासाठी प्रदर्शन आयोजित केले असल्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
मडगाव येथील रवींद्र भवनात फाळणीची भीषणता यावर पुराभिलेख खात्याने प्रदर्शन भरविले होते. त्याचे उद्घाटन मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते झाले. आमदार दिगंबर कामत, उल्हास तुयेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर उपस्थित होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी देशाची फाळणी झाली. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फाळणीमुळे कित्येक निर्वासित, महिलांवर अत्याचार झाले. धार्मिक सलोख्याला तडा गेला असे असूनही देशात संस्कृती व आर्थिक स्थिती सांभाळून विकास केला. हा इतिहास समजून घेतला पाहिजे. युवा पिढीला हा इतिहास समजला पाहिजे. ब्रिटिशांनी जाता जाता फाळणी केली. पण फक्त देशाचीच नाही तर कुटुंबाचे विघटन होते असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.