Home Featured पश्चिम बगल रस्ता येत्या 30 डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास

पश्चिम बगल रस्ता येत्या 30 डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास

0

दक्षिण गोव्यातील पश्चिम बगल रस्ता प्रकल्प उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या 30 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल विधानसभेत दिली. आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्या एका खासगी ठरावाला उत्तर देताना ते बोलत होते.
दक्षिण गोव्यातील पश्चिम बगल रस्ता बाणावली मतदारसंघात स्टील्टवर बांधावा, अशी मागणी व्हिएगस यांनी खासगी ठरावाद्वारे केली. मात्र त्यांनी केलेल्या मागणीनुसार पश्चिम बगल मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतल्यास न्यायालयाने दिलेल्या मुदतीत प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होणे कठीण आहे. त्या भागात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याबाबत योग्य उपाययोजना केली जात आहे, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.