विधानसभा कामकाजाबद्दल गैरउद्गार काढल्यास कारवाई

0
5

काही बिगर सरकारी संघटना व काही व्यक्ती गोवा विधानसभेत चालणाऱ्या कामकाजावर टीका करू लागले आहेत. आमदारांच्या विधानसभेतील कामांविषयी गैर उद्गार काढतआहेत. अशा व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे काल सभापती रमेश तवडकर यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितले. तसेच वृत्तपत्रे व माध्यमांनी विधानसभेचे कामकाज तसेच त्यावेळचे आमदारांचे वर्तन याविषयीगैर लिहून प्रसिद्ध केल्यास अथवा माध्यमाद्वारे टीका केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सभापतींनी सांगितले.