राज्य सरकारकडून दुसरा जनता दरबार पुढील महिन्यात दि. 14 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या दुसऱ्या जनता दरबारात वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे म्हापसा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात, तर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे मडगाव येथील माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारतीमध्ये उपस्थित राहून जनतेची गाऱ्हाणी आणि प्रश्न ऐकून घेणार आहेत.