फोंडा पोलिसांनी पाजीमळ-शिरोडा येथील सुमारे 9 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी तिघांना अटक करण्यात काल यश मिळविले. गेल्या 9 जून 2023 रोजी ही चोरीची घटना घडली होती. या चोरी प्रकरणी संशयित म्हणून गॅबी फर्नांडिस (25, रा. आंबेउदक सावर्डे), शबनम चलवादी (24, रा. नावेली), महमद कासिम शेख (22, रा. चांदर) या तिघांना अटक केली आहे.