ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू आहे, मात्र आता सीबीआय चौकशीही केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. अपघातात आतापर्यंत 288 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.