स्मार्ट सिटीच्या सल्लागारांचे मानधन रोखा : मडकईकर

0
9

पणजी महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू कामांसाठी सल्लागारांना दिला जाणारा निधी त्वरित रोखावा, अशी मागणी पणजीचे माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी काल केली.

महानगरपालिकेच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कामाचा विषय मांडून सुमार दर्जाच्या कामांबाबत चौकशीची मागणी करणार आहे, असेही मडकईकर यांनी म्हटले आहे.

पणजीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व विकासकामांचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीकडून सल्लागारांना रक्कम देणे बाकी असल्यास त्वरित रोखून धरावी, अशी मागणी मडकईकर यांनी केली.
पणजीतील स्मार्ट सिटीतील विकासकामांच्या घोटाळ्याची न्यायालयाने स्वेच्छा दखल घ्यावी, अशी मागणी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी केली.