जगदीश शेट्टर यांचा भाजपला रामराम

0
8

कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असून, त्याआधी भाजपला आणखी एक धक्का बसला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर यांनी शनिवारी रात्री उशिरा भाजपच्या सर्व पदाचा राजीनामा दिला. अद्याप उमेदवारी न मिळाल्याने शेट्टर यांनी हा निर्णय घेतला. भाजपने आतापर्यंत कर्नाटकातील 212 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने पहिल्या यादीत 189 तर दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपने त्यांच्या 19 आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. हुबळी-धारवाड (मध्य) जागेसाठीही भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. शेट्टर हे या जागेचे आमदार होते आणि येथूनच ते उमेदवारी मागत होते.