संवेदनशील विभाग देखरेख समिती स्थापन

0
14

गोवा सरकारच्या पर्यावरण खात्याने राज्यस्तरावरील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभाग देखरेख समितीची स्थापना केली आहे. या 16 सदस्यीय समितीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य सचिव असतील, तर अन्य सदस्यांमध्ये संदीप आजरेकर (निसर्ग नेचर क्लब), मिलिंद गाडगीळ (परशुराम ग्रामीण विकास संस्थान), प्रो. एम. के. जनार्दनम यांच्यासह राज्य तसेच केंद्र सरकारच्या संस्थांवरील सदस्यांचा या समितीवर समावेश असेल. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याने अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, पक्षी अभयारण्य आदींच्या सीमांचा सभोवतालचा भाग यांचा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागात समावेश केला आहे.