Home बातम्या सर्वधर्मसमभाव टिकवण्यासाठी कॉंग्रेस हाच पर्याय : सार्दिन

सर्वधर्मसमभाव टिकवण्यासाठी कॉंग्रेस हाच पर्याय : सार्दिन

0

सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी वगळता अन्य कुणाचीही गरज भासणार नाही, असे ते म्हणाले. भाजप मतदारांची दिशाभूल करण्यासाठी कॉंग्रेसविरोधी लाट असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील वातावरणाचा अंदाज घेतला असता, मतदार कॉंग्रेसच्याच बाजूने असल्याचे दिसून आले आहे, असे ते म्हणाले. ग्रुड फ्रायडे, सेंट झेवियर फेस्त व गांधी जयंती अशा सुट्ट्या रद्द करणारे विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांच्या हाती सत्ता देण्याचा गोमंतकीय जनता विचार करणार नाही, असे कुठ्ठाळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी सांगितले. अल्पसंख्यांकांसाठी भाजपने काय केले याचा प्रत्यय आम्हाला यापूर्वी आल्याचे गुदिन्हो म्हणाले.