ईशान्य भागात भारतीय हवाईदलाचा युद्धसराव

0
17

>> ‘प्रलय’ युद्धाभ्यासात एस-400 स्क्वाड्रन विमानाचा सहभाग

भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव कायम असतानाच भारतीय हवाई दल पुन्हा एकदा युद्धसराव करणार आहे. या युद्ध सरावाला ‘प्रलय’ असे नाव देण्यात आले आहे. हवाई दलाकडून ईशान्य भागात हा मोठा युद्धाभ्यास करण्यात येणार आहे. सर्व प्रमुख एअरबेसमधून युद्धसराव केला जाईल. नुकतेच तैनात करण्यात आलेले एस-400 स्क्वाड्रन हे लढाऊ विमानदेखील या युद्धसरावाचा एक भाग असेल.
भारतीय हवाई दलाचा अलिकडील काही महिन्यांतील हा दुसरा युद्ध सराव आहे. या ङ्गप्रलयफ या युद्धसरावात वाहतूक विमाने, लढाऊ विमाने तसेच राफेल आणि सुखोई-30 लढाऊ विमानांसह आयएफच्या प्रमुख लढाऊ विमानांची ताकद पाहायला मिळणार आहे.

एस-400 ही ताकद

जगातील फार कमी देशांमध्ये एस-400 सारखी हवाई संरक्षण यंत्रणा आहे. भारताने रशियासोबत एस-400 साठी अब्जावधी डॉलर्समध्ये हा करार केला आहे. अलिकडेच भारतीय हवाई दलाने पूर्व सेक्टरमध्ये एस-400 एअर डिफेन्स ड्रोन स्क्वाड्रन लढाऊ विमान तैनात केले आहे. हे लढाऊ विमान 400 किमीच्या रेंजमध्ये शत्रूचे कोणतेही विमान किंवा क्षेपणास्त्र नष्ट करू शकते. सिक्कीम आणि सिलीगुडी कॉरिडॉर सेक्टरमधील प्रतिकूल हालचालींवर लक्ष ठेवून आपली क्षमता वाढवण्यासाठी भारतीय हवाई दलाने एस-400 या भागात वळवले.

चीनच्या वाढत्या कुरापती

सीमाभागात चीनच्या कुरापतींत वाढ होत आहे. डोकलाम भागातही चीन आपल्या कारवाया वाढवत आहे. चीनच्याया कुरापतींवर तसेच सैन्याच्या हालचालींवर भारतीय सुरक्षा यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून आहे. शिलाँगमधील भारतीय हवाई दलाच्या ईस्टर्न एअर कमांडकडे चीनच्या सीमेवर तसेच संपूर्ण ईशान्येकडे पाळत ठेवण्यासाठी हवाई क्षेत्रे आहेत. अनेकदा जेव्हा चिनी विमाने एलसीच्या खूप जवळून उड्डाण करण्याचा प्रयत्न करतात किंवा तेथे भारतीय हवाई क्षेत्रांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लढाऊ विमाने चीनच्या विमानांचा पाठलाग करतात.