औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे यापुढे ऑनलाईन पद्धतीने वाटप

0
9

राज्यातील औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे यापुढे ऑनलाईन पद्धतीने वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, एकदा हे काम पूर्ण झाले की या भूखंड वितरणाच्या कामात पारदर्शकता येणार असल्याचे काल उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत सांगितले. काल प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रश्न गोवा फॉरवर्डचे नेते व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड वितरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली. या भूखंडांचे वितरण करताना, नावात बदल करताना आणि हस्तांतरण करताना मोठा घोटाळा होऊ लागलेला असून, त्यासाठी काहीजण मोठी लाच घेत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला; मात्र माविन गुदिन्हो यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फेटाळून लावला.