इलेक्ट्रिक-सोलर फेरीबोट सेवा ३ महिन्यांनंतर सुरू

0
9

राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक-सोलर फेरीबोटीने पणजी ते चोडण या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून सुरुवात झाली. या इलेक्ट्रिक-सोलर फेरीबोटीचे उद्घाटन ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर गेले तीन महिने ही सोलर फेरीबोट बंदच होती. या सोलर फेरीबोटमध्ये वाहनांना प्रवेश दिला जात नाही, तर केवळ प्रवासी वाहतूक करू शकतात.

या जलमार्गावर ही फेरीबोट १ महिना प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारकडून प्रवाशांकडून तिकीट आकारणीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पणजी ते चोडण या अंतरासाठी २० मिनिटांचा कालावधी लागतो. ही फेरीबोट दिवसाला चार फेर्‍या मारणार आहे.