‘मॉक ड्रिल’मधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा

0
13

>> कोेरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ३ इस्पितळांत चाचपणी

कोेरोनाच्या बीएफ ७ या व्हेरिएंटचे संक्रमण कसे रोखता येईल व त्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा व सेवेची कशी सज्जता हवी, याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार काल बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, तसेच उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांत ‘मॉक ड्रिल’ करण्यात आले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा आणि डॉ. जे. पी. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉक ड्रिल झाले. यावेळी खाटांची उपलब्धता, विलगीकरणासाठीच्या खाटा, ऑक्सिजनधारित खाटा, आयसीयूची क्षमता, व्हेंटिलेटरधारित खाटा तसेच डॉक्टर्स, नर्सेस, सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी, आयुष डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर, अंगणवाडी वर्कर आदी मनुष्यबळाची तपासणी करण्यात आली. रुग्णांची ने-आण करण्यासाठी विविध प्रकारच्या रुग्णवाहिका तसेच टेलिमेडिसन सुविधा आदींचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधा, प्रयोगशाळा, चाचणी किट्‌स, आरटीपीसीआर, आरएटी किट्‌स आदींचाही आढावा घेण्यात आला.