जगासह भारताचीही धाकधूक पुन्हा एकदा कोरोनाने वाढवली आहे. काल दिवसभरात देशात १५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशात एकूण ४,४६,७७,४५९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या घटून ३,४२१ वर पोहोचली आहे.