केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आरोग्य सुविधांचा आढावा

0
13

भारतात कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काल देशभरातील कोविड आरोग्य केंद्रांवर मॉक ड्रिल करण्यात आले. यादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी सफदरजंग रुग्णालयाला भेट देऊन मॉक ड्रिलचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णालयातील अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच ऑक्सिजन पुरवठा आणि व्हेंटिलेटरसाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मांडवीय यांनी पत्रकारांशी संवाद साधला.