काले खाणपट्‌ट्याचा आज होणार लिलाव

0
6

राज्य सरकारच्या खाण खात्याच्या पहिल्या टप्प्यातील खाणपट्‌ट्यांच्या लिलावातील काले येथील चौथ्या खाणपट्‌ट्याची लिलाव प्रक्रिया मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी होणार आहे.
खाण खात्याने पहिल्या टप्प्यात चार खाणपट्‌ट्यांची लिलाव प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यातील तीन खाणपट्‌ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. आता दक्षिण गोव्यातील काले येथील खाणपट्‌ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया शिल्लक असून, मंगळवारी हा लिलाव केला जाणार आहे.

उत्तर गोव्यातील डिचोलीतील पहिला खाणपट्टा वेदांता खाण कंपनीने मिळविला. डिचोलीतील शिरगाव-मये हा दुसरा खाणपट्टा साळगावकर कंपनीने मिळविला, तर मोन्त दी शिरगाव हा तिसरा खाणपट्टा बांदेकर कंपनीने मिळविला आहे.

राज्यातील चार खाणपट्‌ट्यांच्या लिलावात गोव्यासह देशातील एकूण ११ खाण कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे. खाणपट्‌ट्यांच्या लिलावात आत्तापर्यंतचे तीनही खाणपट्टे गोव्यातीलच खाण कंपन्यांनी मिळविले आहेत. आता चौथा खाणपट्टा कोण मिळवितो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.