गेल्या सप्टेंबर महिन्यात अमली पदार्थप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या माकारोव मेक्सिम या रशियन नागरिकाने काल त्याला सुनावणीसाठी पणजी येथील जलद न्यायालयात आणले असता पोलिसांच्या तावडीतून सुटून पळ काढला. गेल्या सप्टेंबर महिन्यात त्याच्याकडे ९ लाख रु. चे हशिश तेल सापडल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. किनारपट्टीतील आपल्या ग्राहकांना तो हे हशिश तेल विकत होता.