देशातील कोरोना रूग्णांच्यासंख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४९२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशभरात एकूण कोरोना रूग्णांची संख्या ४ कोटी ४६ लाख ६९ हजार ०१५ वर पोहोचली आहे. भारतातील कोरोना संसर्गात घट झाली आहे.
२०२२ च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. दररोज लाखो नवीन कोरोनाबाधित मिळत होते. मात्र, आता हे प्रमाण एक हजारांच्याही खाली आलेले आढळून येत आहे. कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत भारतात कोविड प्रतिबंधात्मक लशीचे २१९.८४ कोटी डोस देण्यात आले आहेत.