येत्या २० ते २८ नोव्हेंबर या दरम्यान राज्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) होणार असून, या पार्श्वभूमीवर १८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत या दरम्यान राज्यातील पोलिसांना रजा घेता येणार नसल्याचा आदेश काल काढण्यात आला.
येथील पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी हा आदेश काढला असून, या आदेशात पणजी शहरात वरील काळात इफ्फीचे आयोजन करण्यात येणार असल्याने पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असेल. तसेच वाहतूक व्यवस्थेसह व इफ्फीसाठीच्या बंदोबस्ताची जबाबदारी असेल. त्यामुळे वरील काळात पोलिसांना रजा घेता येणार नसल्याचे प्रभुदेसाई यांनी काल काढलेल्या एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.