मोप येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम करणार्या जीएमआर कंपनीने काल सदर विमानतळाच्या बोधचिन्हाचे अनावरण केले. या बोधचिन्हात सूर्य, वाळू, नारळाची झाडे, समुद्र, आकाश यांचा सुंदर असा मिलाफ आहे. या बोधचिन्हावर ‘न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा’ असे नमूद करण्यात आले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे रितसर उद्घाटन होणार आहे. हा विमानतळ सुरू झाल्यानंतर दरवर्षी ५० लाख प्रवासी या विमानतळाचा लाभ घेणार आहेत. तसेच वाढत्या वाहतुकीनुसार या विमानतळाची क्षमता देखील कालांतराने वाढवण्यात येणार आहे.