जमीन घोटाळा : चौकशी आयोगाचे कामकाज सुरू

0
12

राज्य सरकारने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या एक सदस्यीय आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. जाधव (उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती) यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांनी कालपासून कामकाजाला सुरुवात केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या अधिकार्‍यांनी आत्तापर्यंत नोंदवलेले गुन्हे, तक्रारी आणि तपास कामाच्या सद्यःस्थितीची माहिती व्ही. के. जाधव यांना काल दिली.

पाटो-पणजी येथे जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त आयोगाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्यात आली असून, या आयोगासाठी आवश्यक कर्मचारी वर्गाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. आयोगाकडून तक्रारीच्या प्रत्यक्ष सुनावणीला नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरू केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.