व्हॉट्‌सऍपची सेवा २ तासांनी पूर्ववत सुरू

0
32

जगभरात कोट्यवधी वापरकर्ते असणारे व्हॉट्सऍप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झाले. एकीकडे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सऍप डाऊन झाल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. सुरुवातीला काही काळ व्हॉट्सऍप ग्रुपवर संदेश पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले. पहिल्या अर्ध्या तासातच हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचे ट्विटरवर सांगितले. अखेर जवळपास दोन तासांच्या विस्कळीत सेवेनंतर व्हॉट्सऍप पुन्हा पूर्ववत सुरू झाले.

व्हॉट्सऍपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आधी समोर आली होती. या संदर्भात काही वेळानंतर व्हॉट्सऍपकडून अधिकृतरित्या प्रतिक्रिया देताना ‘लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती देण्यात आली. मात्र, अचानक व्हॉट्सऍप बंद पडल्यामुळे लाखो नेटिझन्सनी ट्विटरकडे धाव घेत आपला संताप तिकडे व्यक्त केला.