पणजी परिसराला पावसाने झोडपले

0
8

पणजी परिसराला शुक्रवारी संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले. तसेच, मांडवी नदीवरील अटल सेतूवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाहने चालवावी लागली. दरम्यान, राज्यात चोवीस तासात सांगे, पेडणे, काणकोण, केपे या भागांना जोरदार पावसाची नोंद झाली आहे. केरळ किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

अटल सेतूवर साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. चोवीस तासांत सांगे येथे सर्वाधिक १.६९ इंच पावसाची नोंद झाली. तर, पेडणे येथे १.२१ इंच, काणकोण आणि केपे येथे प्रत्येकी १ इंच, वाळपई येथे ०.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील साखळी, मडगाव आदी भागात पावसाची कमी प्रमाणात नोंद झाली आहे.