मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेसाठी वयोमर्यादा ६० वरून ५० वर

0
17

मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेखाली वयोमर्यादा आता ६० वर्षांवरून ५० वर्षे अशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांबरोबरच ५० वर्षे पूर्ण झालेल्या गोमंतकीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासंबंधीची अधिसूचना काल सरकारने काढली.

नोव्हेंबर २०२१ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेखाली राज्यातील भाविकांना राज्याबाहेरील तीर्थस्थळे तसेच राज्यातील तीर्थस्थळांवर मोफत जाण्याची सोय राज्य सरकारने केली आहे. आता करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार सोबत मदतीसाठी एका व्यक्तीलाही नेता येणार आहे. त्याशिवाय सरकारने आणखी एका दुरुस्तीद्वारे उत्पन्नाची मर्यादा तसेच १५ वर्षांच्या निवासी दाखल्याची अटही काढून टाकली आहे.