जि. पं. पोटनिवडणुकीसाठी १६ अर्ज ग्राह्य

0
8

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली. त्यात चार उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले. त्यानंतर १६ उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले.
शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर पोटनिवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या रेईश मागूश मतदारसंघातून ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली मतदारसंघातून ८ उमेदवार, तर कुठ्ठाळी मतदारसंघातून ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

भाजपने जिल्हा पंचायतीच्या दोन मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत, तर कॉंग्रेस पक्षाने तीन मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.