राज्यात रस्ता अपघातांचे सत्र सुरूच असून, राजधानी पणजीतील धोकादायक ठरलेल्या चिंबल जंक्शनवर शुक्रवारी सकाळी झालेल्या एका अपघातात कदंब बसची धडक बसल्याने एक सायकलस्वार ठार झाला. या अपघातात ठार झालेला इसम हा चिंबल येथील असून, देऊ म्दार्दोळकर असे त्याचे नाव आहे. देऊ म्हार्दोळकर हे रस्ता पार करण्याच्या प्रयत्न असताना आंतरराज्य मार्गावरील कदंब बसने त्यांना धडक दिली, त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.