कॉंग्रेसच्या अध्यपदासाठीच्या निवडणूकविषयक हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी २४ सप्टेंबरपासून नाम निर्देशन अर्ज दाखल केले जातील. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक आणि १९ ऑक्टोबरला निकालाची घोषणा होणार आहे. अध्यपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी अद्यापर्यंत होकार दिलेला नाही. त्यात आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे.