Home Featured पदकविजेत्या गोमंतकीय खेळाडूंना सरकारी खात्यांत नोकरी : मुख्यमंत्री

पदकविजेत्या गोमंतकीय खेळाडूंना सरकारी खात्यांत नोकरी : मुख्यमंत्री

0

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक प्राप्त करून देणार्‍या गोमंतकीय खेळांडूना सरकारी खात्यात सामावून घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोमंतकीय बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिच्या सन्मान सोहळ्यात केली.

बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या भारतीय महिला संघात भक्ती कुलकर्णी हिचा समावेश होता. या स्पर्धेत महिला संघाला कांस्यपदक प्राप्त झाले. त्यानिमित्त भक्ती कुलकर्णी हिचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते काल पणजीत सन्मान करण्यात आला. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे व इतरांची उपस्थिती होती.

गोवा क्रीडा प्राधिकरणामध्ये (साग) बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिला नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून देणार्‍या गोमंतकीय खेडाळूंनाही अशा प्रकारची ऑफर देण्यात येणार आहे. राज्यातील क्रीडापटूंना सरकारी खात्यांत नोकरी मिळवून देण्यासाठी नोकर्‍यांमध्ये राखीवता ठेवली जाणार आहे. त्यासंबंधीचे धोरण तयार केले जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.