Home Featured अष्टमीच्या फेरीसाठी नव्याने अर्ज वितरण

अष्टमीच्या फेरीसाठी नव्याने अर्ज वितरण

0

वार्षिक अष्टमी फेरीसाठी विक्रेत्यांना नव्याने अर्ज वितरित करण्याचा निर्णय पणजी महानगरपालिकेने घेतला आहे, अशी माहिती आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांनी काल दिली. मांडवी तीरावरील फेरीत सुमारे चारशे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉल्सच्या अर्ज वितरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला होता. त्यामुळे नव्याने अर्ज वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीच्या अर्जांसाठी घेतलेले शुल्क परत केले जाणार आहे.