लष्कर-ए-तैयबा आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतून एका व्यापार्याला काल अटक केलीे. मोहम्मद यासीन असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडे २४ लाख रुपये आले होते. त्यापैकी १७ लाख रुपये दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचले आहेत.