राज्यात मागील चोवीस तासांत नवीन १५६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १४.०२ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ९१८ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १११२ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. मागील चोवीस तासांत आणखी १७९ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०९ टक्के एवढे आहे. दरम्यान, कोरोना बळींची एकूण संख्या ३९५७ एवढी आहे.