>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती
दैनिक नवप्रभाचा ५२ वा वर्धापनदिन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे, राज्यसभेचे खासदार श्री. विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे, मत्स्योद्योग मंत्री श्री. नीळकंठ हळर्णकर, माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. दिगंबर कामत, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते श्री. विजय सरदेसाई, श्री. दुर्गादास कामत, माजी आमदार श्री. दामू नाईक, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. संजीव देसाई आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. नवप्रभाच्या कर्मचारीवर्गातर्फे यावेळी श्री. सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत, मंत्री सर्वश्री रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, श्री. दुर्गादास कामत, माजी आमदार दामू नाईक भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे, श्री. संजीव देसाई, उद्योजक श्री. अगरवाल, श्री. यतीश धेंपो, डॉ. शेखर साळकर, माजी उपसभापती श्री. शंभू भाऊ बांदेकर, माजी मजूर आयुक्त श्री. शरत्चंद्र देशप्रभू, माजी आमदार श्री. धर्मा चोडणकर, उद्योजक श्री. मांगीरिश पै रायकर, लेखिका सौ. ज्योती कुंकळकर व सौ. संपदा कुंकळकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. गुरुदास सावळ, सतीश नाईक, लोककलांचे अभ्यासक डॉ. पांडुरंग फळदेसाई, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, नवप्रभेचे माजी संपादक श्री. सुरेश वाळवे, पत्रलेखक श्री. तुकाराम शेटगावकर, ऍड. सुभाष पुंडलिक सावंत, ज्येष्ठ पत्रकार श्री. अनिल पै, श्री. कमलाकर हुम्रसकर, श्री. प्रकाश देसाई, विवेकानंद केंद्राचे श्री. वल्लभ केळकर, रेडिओ जॉकी नम्रता, श्री. विजयसिंह आजगावकर, श्री. नागेश सरदेसाई, श्री. अजित मांद्रेकर, प्राईम ऍडव्हर्टायझिंगचे श्री. राजेश मोरजकर, नॅशनल फोटो स्टुडिओचे श्री. प्रवीण पेडणेकर, सौ. सोनिया गुरव कुर्हेकर, अक्षय कुर्हेकर आदींनी नवप्रभेला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. एन. व्यंकटेश्वरन, नवहिंद पेपर्स अँड पब्लिकेशन्सचे वरिष्ठ सरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर, नवप्रभेचे प्रतिनिधी श्री. बबन भगत, श्री. प्रमोद ठाकूर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सौ. मनीषा व श्री. विजयानंद नाईक यांनी श्रीसत्यनारायण पूजेचे यजमानपद भूषविले. नारायण भट यांनी पौरोहित्य केले.