खाद्यतेलात स्वयंपूर्ण होण्यावर पंतप्रधानांचा बैठकीत भर

0
16

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल रविवारी नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत देश खाद्यतेलात कसा स्वयंपूर्ण होईल यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी पंतप्रधानांनी कृषी विविधीकरणाचे महत्त्व व्यक्त केले, या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहरी प्रशासन, कोविडनंतरची परिस्थिती आणि २०४७ चे लक्ष्य, या विषयांवरही चर्चा झाली. याशिवाय डाळींचे उत्पादन आणि पुढील वर्षी भारतात होणार्‍या जी-२० बैठकीबाबतही यावेळी चर्चा झाली.

बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी विविध विषयांवरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला बहुतेक सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, एस जयशंकर तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राह