आसगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणात महिलेला अटक

0
17

राज्यातील जमीन घोटाळ्याचा तपास करणार्‍या एसआयटीने आसगाव येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. अंजुम शेख (वय ४१ वर्षे, बंगळूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. एसआयटीने या जमीन घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या महम्मद सुहेल शफी याची अंजुम शेख ही पत्नी आहे. आसगाव येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. महम्मद सुहेल हा आसगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.