सोनिया गांधींची उद्या ईडीकडून पुन्हा चौकशी

0
42

नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने २६ जुलै रोजी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना समन्स बजावले असून त्यांची उद्या पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशी दरम्यान कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे.

गेल्यावेळेप्रमाणेच कॉंग्रेस खासदार संसद भवनात निदर्शने करून पक्ष मुख्यालयात येतील आणि ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करतील. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी यांना नवीन समन्स पाठवले होते. त्यानुसार त्यांना २५ जुलैऐवजी २६ जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

यापूर्वी गुरुवारी ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे तीन तास चालली. त्या दिवशीही कॉंग्रेसकडून निदर्शने झाली होती. कॉंग्रेस पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना २६ जुलै रोजी शांततापूर्ण सत्याग्रह आयोजित करण्यास सांगितले आहे.