ग्रामपंचायत निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच

0
16

>> उच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाला अंतरिम दिलासा नाही

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल ग्रामपंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणार्‍या सहा याचिकादारांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार घेण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. न्यायालयाने हडङ्गडे-नागवा, कांदोळी, साळगाव, पर्रा आणि मांद्रे या पाच पंचायत क्षेत्रांतील निवडणूक निकालाचे भवितव्य ओबासी आरक्षण आव्हान याचिकांच्या अंतिम निवाड्यावर अवलंबून राहणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ग्रामपंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणार्‍या सहा याचिका दाखल करण्यात आल्या आहे. न्यायालयाने या याचिकांवर प्राथमिक सुनावणी घेऊन याचिका दाखल करून घेतल्या आहेत.

न्यायालयाकडून आव्हान याचिकांवर सुनावणी लवकरच घेतली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टचे पालन करण्यात आलेले नाही, असा दावा याचिकादारांनी केला आहे.
न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाबाबतच्या अंतिम निवाड्यावर पाच ग्रामपंचायतीमधील निवडणूक निकालाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे वकील ऍड. एस. एन. जोशी यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाबाबत केवळ पाच पंचायत क्षेत्रात याचिका दाखल करण्यात आल्याने त्या पाच पंचायतींना निवाडा लागू करण्याची विंनती न्यायालयाला केली होती, असेही ऍड. जोशी यांनी सांगितले.

पाचव्या दिवशी १९६२ उमेदवारी अर्ज दाखल

>> निवडणुकीसाठी पाच दिवसांत ३४५४ अर्ज

राज्यातील १८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी दिवशी १९६२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाच दिवसांत कालपर्यंत ३४५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. तशी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांच्या संख्येत वाढ होत आहे.

पाचव्या दिवशी उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात १८७ अर्ज, डिचोली तालुका १६० अर्ज, सत्तरी ९० अर्ज, बार्देश तालुका ३९६ अर्ज, तिसवाडी २३२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
दक्षिण गोव्यातील ङ्गोंडा तालुका २२४ अर्ज, धारबांदोडा ५० अर्ज, सांगे तालुका ५७ अर्ज, सालसेत तालुका ३३५ अर्ज, मुरगाव तालुका ९८ अर्ज, केपे तालुका ७१ अर्ज आणि काणकोण तालुक्यात ६२ अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.