संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयाने खासदारांसाठी जारी केला आहे. यापुढे संसद भवन परिसरात निदर्शने, आंदोलने व उपोषण करण्यावर बंदी असेल. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, असंसदीय शब्द काढून टाकण्याचे वृत्त आल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नव्या नियमानुसार, शब्दांवर बंदी नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण करू नका, असे बिर्ला यांनी म्हटले आहे.